रियल माद्रिदचा संघ ठरला डब्लूडब्लूईचा चॅम्पियन

सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकणारा रियल माद्रिदचा संघ आता डब्लूडब्लूई चा ही चॅम्पियन झाला आहे.

मे महिन्यात जिंकलेले हे रियलचे 13वे विजेतेपद ठरले. तसेच युरोपातील हा पहिलाच क्लब आहे ज्यांनी सलग तीन वेळा हे विजेतेपद जिंकले आहे. यामुळे डब्लूडब्लूई चा कार्यकारी उपप्रमुख ट्रिपल एचने आनंदी होऊन रियलला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

ज्यामध्ये त्याने रियलला चॅम्पियन्स लीग बरोबर डब्लूडब्लूईचा ही चॅम्पियन्स ठरवला आहे. यावेळी त्याने रियलने डब्लूडब्लूईच्या चॅम्पियन्सप्रमाने आंनद साजरा करावा असे ट्विट केले आहे.

तसेच रियलच्या खेळाडूंनीही आपण डब्लूडब्लूईचे चॅम्पियन्स झालो अशी पोस्ट केली आहे.

क्रिस्तियानो रोनाल्डो नंतर कोण हा प्रश्न संघाबरोबर चाहत्यांनाही पडला होता. म्हणून चाहत्यांनी स्पेनमध्ये घेतलेल्या सर्वेमध्ये इंग्लंडच्या हेरी केन याला सर्वाधिक अशी २००,००० मधून २६%मते मिळाली. पण त्याने तोटेनहॅम हॉटस्पर या इंग्लिश फुटबॉल क्लबसोबत केलेला करार २०२४पर्यंत वाढवला आहे.

तर गॅरेथ बॅले हा रोनाल्डोची जागा घेण्यास तयार झाला आहे. त्यालाही आधी मॅंचेस्टर युनायटेड या क्लबमध्ये जाण्याची इच्छा होती.

रियलच्या संघाने चॅम्पियन्स लीग बरोबरच 33 ला लीगा आणि 19 कोपा डेल रे यांची विजेतेपद जिंकले आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माने मानले ट्रिपल एचचे आभार 

मोठी बातमी- संयुक्त राष्ट्राचे प्रमाणपत्र मिळवणारा हा ठरला पहिलाच फुटबॉल क्लब

पॉल पोग्बा याने त्याचे विश्वविजेतेपदाचे गोल्ड मेडल दिले या व्यक्तीला