हॅरी केन बनू शकतो २०० मिलियन रकमेचा खेळाडू

इंग्लंड फुटबॉल संघाचा खेळाडू आणि टोट्टेनहॅम हॉटस्पर क्लबचा सर्वात महत्वाचा खेळाडू हॅरी केन याला रिअल माद्रिद संघात घेण्यासाठी माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान किती उत्सुक आहेत हे सर्वन्यात आहे. झिदान यांनी याबाबत अनेकदा बोलूनही दाखवले आहेत की ते हॅरी केनला संघात घेण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मागील काही सामन्यातील माद्रिद संघाची कामगिरी पाहता त्यांना दुसऱ्या मुख्य स्ट्रायकरची किती गरज आहे हे देखील समजते.

चॅम्पियन ट्रॉफीसाठी सामन्यासाठी टोट्टेनहॅम हॉटस्पर संघ माद्रिदला भेट देणार आहे. त्यामुळे झिदान आणि माद्रिदचे एजन्ट हॅरी केनसमोर चांगले प्रस्ताव मांडतील अशी चर्चा आहे. माद्रिद संघाने हॅरी केनसाठी १५० मिलियन युरोचा प्रस्ताव पाठवला आहे अशी चर्चा होती. परंतु त्यावर अधिकृतपणे कोणीही घोषणा केली नाही.

जर ‘द टाइम्स’ च्या बातम्यांचा विचार केला तर स्पुर्स क्लबचे अध्यक्ष डॅनियल लेव्ही हे हॅरी केनला दुसऱ्या संघाशी काराबद्ध होऊ देण्यास सकारात्मक नाहीत. ते हॅरी केनसाठी २०० मिलियन पाउंड इतकी रक्कम ते माद्रिद समोर ठेवतील. नेमारला मिळालेल्या रकमेचा विचार केला तर ते हॅरी केनसाठी २०० मिलियन पाउंड रक्कम ठरवण्याची शक्यता जास्त आहे.

सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत झिदान म्हणाले होते की,”हॅरी केन हा परिपूर्ण खेळाडू आहे. तो स्पुर्स संघासाठी खूप चांगला खेळ करत आहे. त्याच्या खेळातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याला नेहमी गोल करायचा असतो, त्यासाठीचे विचार त्याच्या डोक्यात असतात. मी त्याला माद्रिद संघासाठी करारबद्ध करण्यास उत्सुक आहे.”

मागील काही मोसमात माद्रिद संघाने स्पुर्स संघाकडून महत्वाचे खेळाडू काराबद्ध केले आहेत. गॅरेथ बेल आणि लुका मॉड्रीच हे त्यापैकी एक आहेत. हॅरी केन याने ग्रुप एचमध्ये सर्वाधीक दोन सामन्यात ५ गोल केले आहेत.