रियल मॅद्रिद विरुद्ध लीवरपुल रंगणार युसीएलचा अंतिम सामना!

युसीएलच्या उपांत्यफेरीचा थरार बुधवारी संपुष्टात आला. दोन टप्प्यामध्ये झालेल्या सामन्यात रियल मॅद्रिदने बायर्न मुनिचचा तर लीवरपुलने रोमा संघाचा पराभव केला. रियल मॅद्रिदला सलग तिसर्यांदा विजेतेपद मिळवायचा तर लीवरपुलला २००४-०५ नंतर पहिल्यांदा युसीएल जिंकायचा मान मिळेल.

त्याआधी काल आणि आज दूसर्या टप्प्याचे सामने झाले. उपउपांत्य फेरीत शेवटच्या मिनिटला पेनल्टीवर गोल करत उपांत्य फेरीत आलेल्या मॅद्रिदला बायर्न मुनिचने कडवी झुंज दिली.

सामन्याच्या ३ मिनिटलाच बायर्नने गोल करत मॅद्रिदला धोक्याचा इशारा दिला. ११ व्या मिनिटला मार्सेलोच्या आलेल्या अप्रतिम क्राॅसवर बेन्झेमाने हेडरेने गोल करत सामना बरोबरीत आणला.

सामन्यात बायर्नने अनेक आक्रमण केली पण त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात सतत अपयश आले. पहिला हाफ १-१ ने बरोबरीत सुटल्यावर सामन्याच्या उत्तरार्धात सुरुवातीलाच बायर्नच्या गोलकीपरची चुक मॅद्रिदला सामन्यात २-१ ची आघाडी मिळवून गेली.

बायर्नने सामन्याच्या ६३ व्या मिनिटला जेम्स राॅड्रिगेजच्या गोलच्या मदतीने सामन्यात बरोबरी साधली. विजयासाठी केवळ एक गोलची गरज असतानासुद्धा त्यांना तो गोल करण्यात यश मिळाले नाही आणि दोन्ही टप्प्यातील गोल्सच्या ४-३ अश्या आघाडीने मॅद्रिदने अंतिम फेरीत सलग तिसर्यांदा प्रवेश केला.

तर आज झालेल्या सामन्यात रोमा बार्सिलोना नंतर परत लीवरपुल समोर पहिल्या टप्प्यातील ३ गोल्सचा फरक असताना त्यांनापण बाहेर काढेल का असा प्रश्न सगळ्यांसमोर होता. पण लीवरपुलने ७ व्या मिनिटलाच गोल करत सामन्यात आघाडी घेतली.

१५ व्या मिनिटला झालेला स्वयंगोलने रोमाला सामन्यात १-१ ची बरोबरी साधता आली. २५ व्या मिनिटला लीवरपुलने परत सामन्यात आघाडी घेतली आणि ती त्यांना पुर्वार्धापर्यंत टिकवण्यात यश मिळाले.

उत्तरार्धात रोमाने लागोपाठ आक्रमण चालू केले आणि त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात त्यांना ५२ व्या मिनिटला यश मिळाले. सामना शेवटच्या ५ मिनिटात पोहचला असताना रोमाने ८६ व्या मिनिटला गोल करत सामना ३-२ वर आणला.

बरोबरीसाठी २ गोल लागत असताना त्यांना अतिरिक्त वेळेत मिळालेल्या पेनल्टीच्या जोरावर एक गोल करण्यात यश मिळाले.

दोन्ही टप्प्यात मिळून लीवरपुलने सामना ६-७ ने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. युसीएलच्या इतिहासात बाद फेरीत सर्वाधीक गोल्सचा विक्रम आपल्या नावे केला.

तसेच लीवरपुलच्या सलाह, फिरमिनो आणि मानेने या मोसमात २९ गोल्स करत रोनाल्डो, बेले आणि बेन्झेमाच्या २०१३-१४ मधील २८ गोल्सचा विक्रम मोडीत काढला.

दूसर्या टप्प्यात या मोसमातील सर्वोत्कृष्ट खेळ करणारे रोनाल्डो आणि सलाह काही विशेष करु शकले नाही. अंतिम सामन्यात दोघांच्या खेळावर सर्वांचे लक्ष असेल.

अंतिम सामना २७ मे २०१८ ला भारतीय वेळेनुसार रात्री १२.१५ वाजता अाहे.

महत्त्वाच्या बातम्या –

पहा व्हिडीवो- बर्थडेचं यापेक्षा चांगले सरप्राईज असुच शकत नाही!

कोहलीपेक्षा मी लांब षटकार मारतो, मग कशाला कमी खायचं!

अफगाणिस्तान भारताविरुद्ध खेळणार आहे, विराट कोहली विरुद्ध नाही

बेंगलोर चाहत्यांसाठी गुड न्युज, सीएसकेची धुलाई करण्यासाठी हा खेळाडू सज्ज

सगळ्यांनी माघार घेतली असताना हा देश करणार पाकिस्तानचा दौरा?