ट्विटरवर आयसीसी महिला विश्वचषकाचा बोलबाला !

या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी महिला विश्वचषकाची पहिल्यांदाच एवढी चर्चा झाली. सर्वच माध्यमांबरोबर चाहत्यांनीही या विश्वचषकाची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली.

परंतु ट्विटरची आकडेवारी काही विशेष राहिली. #WWC17 हा हॅशटॅग हा कोणत्याही प्रकारच्या महिलांच्या क्रीडा स्पर्धेत सर्वात जास्त २०१७मध्ये वापरला गेलेला हॅशटॅग ठरला. २०१३ विश्वचषकापेक्षा तो २४% जास्त आहे.

#WWC17Final हा आजपर्यंत महिलांच्या कोणत्याही क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वात जास्त वापरलेला हॅशटॅग ठरला. या स्पर्धेत प्रथमच महिला संघाच्या कर्णधारांच्या नावाने ट्विटरने ईमोजी सुरु केल्या होत्या