तिसऱ्या टी २० सामन्यात झाले हे खास विक्रम

मुंबई। भारत विरुद्ध श्रीलंका संघात आज वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे पार पडलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी २० सामन्यात भारतीय संघाने ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने श्रीलंकेला ३-०ने व्हाईटवॉश दिला.

या सामन्यात झालेले काही खास विक्रम:

# आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात ८०० पेक्षा जास्त धावा आणि ४० पेक्षा जास्त बळी घेणारा हार्दिक पंड्या चौथा भारतीय. याआधी कपिल देव(१९८२,८३,८६), रवी शास्त्री(१९८३) आणि मनोज प्रभाकर(१९९३) यांनी केला होता हा विक्रम.

# भारताकडून आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये पदार्पण करणारा वॉशिंग्टन सुंदर सर्वात कमी वयाचा खेळाडू (१८ वर्षे ८० दिवस).  या आधी हा विक्रम रिषभ पंतच्या नावावर होता.

# १०० टी २० सामने खेळवण्यात आलेले वानखेडे स्टेडियम ठरले भारतातले पहिले स्टेडियम आणि जगातले नववे स्टेडियम.

# आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय टी २० मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा रोहित शर्मा दुसरा कर्णधार, भारत विरुद्ध श्रीलंका संघात झालेल्या या मालिकेत रोहितच्या १६२ धावा, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलिअमसन या यादीत अव्वल (१७५ धावा विरुद्ध पाकिस्तान)

# आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय टी २० मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर. (११ षटकार विरुद्ध श्रीलंका).

# रोहित शर्माने २०१७ या वर्षात क्रिकेटच्या सर्व प्रकारात मिळून श्रीलंकेविरुद्ध ठोकले ३८ षटकार. एका कॅलेंडर वर्षात कोणत्याही फलंदाने एखाद्या प्रतिस्पर्ध्या विरुद्ध मारलेले सर्वाधिक षटकार.

# क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एका वर्षात सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय संघ ३७ विजयांसह दुसरा; या विक्रमात ऑस्ट्रेलिया अव्वल (३८ विजय २००३ साली)

# आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा विजयी संघात असणाऱ्या खेळाडूंमध्ये एम एस धोनी ५१ विजयासह तिसऱ्या तर ४५ विजयांसह रोहित शर्मा सहाव्या स्थानी.

# श्रीलंकेचा आंतरराष्ट्रीय टी २० मधील आठवा पराभव, त्यांची टी २० प्रकारातील सर्वात खराब कामगिरी