टॉप ५: अमला आणि डीकॉकने मोडले सचिन विराटचे हे विक्रम

दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांग्लादेश पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने १० विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दोन्हीही सलामीवीरांनी शतके झळकावली.

हाशिम अमलाने ११२ चेंडूत ११० धावा केल्या. तर क्विंटन डी कॉकने १४५ चेंडूत १६८ धावा केल्या. या दोघांनी २८२ धावांची भागीदारी रचली. त्याचबरोबर त्यांनी वनडेत काही विक्रमही केले.

हाशिम अमला आणि क्विंटन डी कॉकने केलेले हे विक्रम:

– एकही बळी न गमावता सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग. दक्षिण आफ्रिकेला २७९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. त्यांनी मागच्या वर्षी इंग्लंडने श्रीलंके विरुद्ध केलेल्या २५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रम मोडला.

-दक्षिण आफ्रिकेसाठी २८२ धावांची सर्वाधिक सलामीची भागीदारी. या आधी जेसन रॉय आणि अॅलेक्स हेल्स यांनी २५६ धावांची भागीदारी केली होती. क्रिकेट इतिहासात सर्वाधिक सलामीची भागीदारी सनथ जयसूर्या आणि उपुल थरंगा यांच्या नावावर आहे. त्यांनी इंग्लंड विरुद्ध २००६ मध्ये २८६ धावांची भागीदारी केली होती.

-८६ डावात डी कॉकचे १३ वे शतक. त्यांने विराटची बरोबरी केली आहे. जलद १३ शतके करण्याच्या यादीत आता हे दोघे दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर अजूनही अमलाच अव्वल स्थानी कायम आहे त्याने ८३ डावात हा विक्रम केला होता.

-हाशिम अमलाने १५४ डावात २६ वे शतक केले. हे शतक करताना त्याने विराटचा जलद २६ शतके करण्याचा विक्रम मोडला. विराटने १६६ डावात २६ शतके केली होती.

-हाशिम अमला आणि डिकॉक यांच्या भागीदारीने ३६६४ धावा केल्या आहेत. वनडेत दक्षिण आफ्रिकेकडून या जोडीच्या या सर्वाधिक धावा. त्यांनी हर्षल गिब्स आणि ग्रामी स्मिथ या जोडीच्या ३६०७ धावांचा विक्रम मोडला. त्याचबरोबर क्रिकेट इतिहासात जोडीच्या सर्वाधिक धावांच्या यादीत ७७ व्या स्थानी.

-हाशिम अमला आणि डिकॉक यांनी एकाच सामन्यात दोघांनीही सर्वाधिक शतक करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीची बरोबरी केली. यांनी चौथ्यांदा अशी कामगिरी केली. या यादीत अमला आणि एबी डीविलिअर्स ५ शतकांसह अव्वल स्थानी आहेत.

या सामन्यात झालेले आणखी काही विक्रम:

-शाकिब अल हसनचा वनडेत ५००० धावा आणि २०० पेक्षा जास्त बळी घेणाऱ्या ५ खेळाडूंमध्ये समावेश. या यादीत सनथ जयसूर्या, जॅक कॅलिस, शाहिद आफ्रिदी आणि अब्दुल रझाकचा समावेश.

– तमिम इक्बालनंतर शाकिब अल हसन बांगलादेशचा दुसरा ५००० पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज. तमिम इक्बालच्या ५७४३ धावा तर शाकिब अल हसनच्या ५०१२ धावा.

-दक्षिण आफ्रिकेकेविरुद्ध बांगलादेश फलंदाजाकडून पहिले शतक. मुस्तफिजूर रहीमने केले नाबाद ११० धावा. या आधी सौम्या सरकारच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक ९० धावा होत्या.

– डेव्हिड मिलर क्रिकेट इतिहासातील ३ रा खेळाडू ज्याने १०० वनडे सामने खेळूनही कसोटीत पदार्पण केले नाही. याआधी रोहित शर्माने १०८ वनडेनंतर कसोटी पदार्पण केले तर किरॉन पोलार्डने १०१ वनडेनंतरही एकही कसोटी सामना खेळला नाही.