प्रीमियर लीग: लीव्हरपूलला अनोखा विक्रम करण्याची संधी

प्रीमियर लीगमध्ये लीव्हरपूलला अनोखा विक्रम करण्याची संधी आहे. या लीगचे सलग पाच सामने जिंकणे हे लीव्हरपूलच्या बाबतीत 1990-91 नंतर प्रथमच घडले आहे. तसेच जर त्यांनी उद्याचा (22सप्टेंबर) साउथप्टन विरुद्धचा सामना जिंकला तर ते सलग सहा सामने जिंकणारा चौथाच क्लब ठरेल.

याआधी अशी कामगिरी न्युकॅसलने 1994, मॅंचेस्टर सिटीने मागील दोन हंगामात आणि चेल्सीने 2005 आणि 2009च्या प्रीमियर लीगमध्ये केली आहे.

तसेच चेल्सीलाही लीव्हरपूल प्रमाणेच सलग सहा सामने जिंकण्याची संधी आहे. त्यांनी प्रीमियर लीगचा पुढचा एक सामना जिंकला तर ते सलग या लीगचे सहा सामने तीन वेळा जिंकणारा पहिला क्लब ठरेल. याआधी त्यांनी असे 2005 आणि 2009च्या प्रीमियर लीगचे सलग सहा सामने जिंकत विजेतेपदही पटकावले आहे.

लीव्हरपूलला 1990-91 नंतर प्रथमच या लीगचे पहिले सात सामने जिंकण्याची पुन्हा एक संधी आहे. त्यांच्या या हंगामाला चांगलीच सुरूवात झाली आहे. प्रीमियर लीग बरोबरच त्यांनी चॅम्पियन्स लीगचा पहिला सामना जिंकला आहे. पॅरीस सेंट-जर्मेन विरुद्धच्या थरारक सामन्यात रॉबेर्तो फिरमिनोच्या गोलच्या जोरावर त्यांनी हा विजय मिळवला.

लीव्हरपूलने नवीन मॅनेजर यर्गेन क्लॉप यांच्या व्यवस्थापनेखाली उत्तम कामगिरी केली आहे.

रशिया फिफा विश्वचषकात लीव्हरपूलचे पाच खेळाडू उपांत्यपूर्व सामन्यांपर्यंत खेळले होते. तर दुसरीकडे चेल्सी, टोटेनहॅम हॉट्स्पर, मॅंचेस्टर सिटी आणि मॅंचेस्टर युनायटेड या क्लबचे मिळून 11 खेळाडू अंतिम सामन्यापर्यंत खेळले होते.

15 सप्टेंबरला झालेल्या सामन्यात लीव्हरपूलने टोटेनहॅमचा 2-1 असा पराभव केला होता. यावेळी या सामन्यात विश्वचषकात खेळलेल्या नऊ खेळाडूंचा सहभाग होता.

क्लॉपने विश्वचषकातील खेळाडूंचा उत्तमरीत्या वापर करत त्यांच्या अनुभवांचा योग्य पद्धतीने कामी लावत संघाचा विजय निश्चित करत गेले.

लीव्हरपूलचा कर्णधार जॉर्डन हेंडरसनने पॅरीस सेंट जर्मेन विरुद्धच्या या एकाच सामन्यात खेळत महत्त्वाची भुमिका पार पाडली. तो विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून खेळला होता.

तसेच आता लीव्हरपूलला 29 वर्षांत पहिल्यांदाच विजेतेपद जिंकण्याची संधी आहे. त्यातच त्यांचा क्रोएशियन डिफेंडर देजॅन लोव्हरेन हा दुखापतीतून परतत असून तो साउथप्टन विरुद्धच्या सामन्यासाठी फिट आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

प्रीमियर लीग बरोबरच चेल्सीची युरोपा लीगमध्येही विजयी सुरूवात

क्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नकोसा असा विक्रम