योनेक्स सनराईज एमएसएलटीए १३व्या रमेश देसाई मेमोरियल सीसीआय १६वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रेनी सिंगला दुहेरी मुकुटाची संधी

मुंबई। क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्या तर्फे आयोजित योनेक्स सनराईज एमएसएलटीए 13व्या रमेश देसाई मेमोरियल सीसीआय 16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात रेनी सिंगला हिने दुहेरी गटातील विजेतेपदाबरोबरच एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. दुहेरीत मुलींच्या गटात वैष्णवी अडकर व रेनी सिंगला यांना, तर मुलांच्या गटात निखिल निरंजन व डेनिम यादव यांनी विजेतेपद पटकावले.

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात चंदीगडच्या पाचव्या मानांकीत कृष्णा हुडा याने हरियाणाच्या दुस-या मानांकीत चिराग दुहानचा 2-6, 6-4, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत पंजाबच्या चौथ्या मानांकीत धृव तंग्रीने हरियाणाच्या नवव्या मानांकीत करण सिंगचा 6-4, 7-5 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

मुलींच्या गटात तेलंगणाच्या अव्वल मानांकीत संजना सिरीमल्ला हीने हरियाणाच्या आठव्या मानांकीत परी सिंगचा 6-1, 6-1 असा तर दुस-या लढतीत हरियाणाच्या सातव्या मानांकीत रेनी सिंगलाने कर्नाटकच्या नैशा श्रीवास्तवचा 6-1, 6-3 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

दुहेरीच्या मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत कर्नाटकच्या निखिल निरंजनने मध्यप्रदेशच्या डेनिम यादवच्या साथीत चंदीगडच्या अजय सिंग व कृष्णा हुडा या जोडीचा 6-3, 6-4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. तर मुलींच्या गटात हरियाणाच्या रेनी सिंगलाने महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरच्या साथीत ऋतूजा चाफळकर व हृदया शहा यांचा 3-6, 6-3, 11-9 असा सुपरटायब्रेकमध्ये पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

उपांत्य फेरी: 16वर्षाखालील मुले:

धृव तंग्री(4)(पंजाब)वि.वि. करण सिंग(9)(हरियाणा)6-4, 7-5
कृष्णा हुडा(5)(चंदीगड) वि.वि चिराग दुहान(2)(हरियाणा) 2-6, 6-4, 6-1

उपांत्य फेरी: 16वर्षाखालील मुली:

संजना सिरीमल्ला(1)(तेलंगणा) वि.वि परी सिंग(8)(हरियाणा) 6-1, 6-1
रेनी सिंगला(7)(हरियाणा) वि.वि नैशा श्रीवास्तव(कर्नाटक) 6-1, 6-3

दुहेरी गट-मुले- अंतिम फेरी

निखिल निरंजन(कर्नाटक)/ डेनिम यादव(मध्यप्रदेश) वि.वि अजय सिंग(चंदीगड)/ कृष्णा हुडा(चंदीगड) 6-3, 6-4

दुहेरी गट-मुली- अंतिम फेरी

रेनी सिंगला(हरियाणा)/वैष्णवी अडकर (महाराष्ट्र) वि.वि ऋतूजा चाफळकर(महाराष्ट्र)/ हृदया शहा(महाराष्ट्र) 3-6, 6-3, 11-9