आयपीएलमध्ये सावळागोंधळ, नो बाॅल रिप्लेमध्ये दाखवला जूनाच बाॅल

मुंबई । आयपीएलच्या ११व्या हंगामात आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर सामन्यात एक गंभीर बाब समोर आली. 

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरसमोर 214 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना जेव्हा बेंगलोरच्या उमेश यादवला बाद देण्यात आले तेव्हा नो बाॅल चेक करताना आधीच्याच चेंडूचे फुटेज वापरण्यात आले.

ही गोष्ट समोर आली कारण या जून्या फुटेजमध्ये चक्क स्वत उमेश यादवचं नाॅन स्टाईकर एंडला दिसत आहे.

ही संपुर्ण घटना १८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घडली. जेव्हा बूमराहच्या गोलंदाजीवर उमेश यादव रोहीत शर्माकडे झेल देउन बाद झाला, तेव्हा पंचांनी तो चेंडू नो बाॅल आहे का हे पाहीले. यावेळी नो बाॅलचे जुने फुटेज दाखवण्यात आले.

या सामन्यात या सामन्यात मुंबईने 46 धावांनी विजय मिळवला आहे. विराट कोहलीने या सामन्यात 62 चेंडूत नाबाद 92 धावा केल्या आहेत. यात त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले. पण बाकी फलंदाजांची योग्य साथ त्याला न मिळाल्यामुळे बेंगलोरला पराभव स्विकारावा लागला. 

 मुंबईकडून आज कर्णधार रोहीत शर्माने 10 चौकार आणि 5 षटकारांच्या सहाय्याने 52 चेंडूत 94 धावा केल्या.