ऑस्ट्रेलियाची साडेसाती संपेना, पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच बॅकफूटवर

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑक्टोबरमध्ये युएई येथे कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी अनफिट असल्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडला मुकावे लागणार आहे.

याची माहिती ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने गुरुवारी (९ ऑगस्ट) दिली.

ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाच्या म्हणाण्यानुसार हे दोनही गोलंदाज त्यांच्या दुखापतीतून आजूनही सावरले नाहीत. त्यामुळे कसोटी सामन्याती पाच दिवस मैदानावर घालवने त्यांच्यासाठी जड गेले असते.

दक्षिण आफ्रीका दौऱ्यानंतर कमिन्स आणि हेझलवूडाला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळता आला नाही.

चेंडूशी छेडछाड आणि खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला, त्यांचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क फिट झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

मिचेल स्टार्कला इंग्लंड विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत दुखापतीमुळे सहभागी होता आले नव्हते. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडने ५-० असा पराभव केला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-इंग्लंड विरुद्ध भारत: दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर पावसाचे पाणी!

-दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून खेळणाऱ्या ११ खेळाडूंची यादी सोशल माध्यमांवर लिक