रोहित शर्मा भारताचा उप-कर्णधार ?

रोहित शर्माने नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्व खाली मुंबई इंडियन्सला तिसऱ्यांदा आयपीएलच्या विजेते पदाचा मान मिळवून दिला. मुंबईने २०१३,२०१५ आणि २०१७ मध्ये आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. आणि तिन्ही वेळा रोहित शर्माचं संघाचा कर्णधार होता. त्याच्या आयपीएलमधील उत्तम नेतृत्वामुळेच कदाचित येत्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उपकर्णधार पदासाठी त्याचे नाव घेतले जात आहे. इंग्लंड आणि वेल्स मध्ये होणाऱ्या या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत लवकरच रवाना होणार आहे. मुख्य स्पर्धेच्या आधी भारत २ सराव सामने खेळणार आहे. भारताचा पहिला सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर आहे.

 

भारत या स्पर्धेमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन म्हूणन उतरेल. भारताचं नेतृत्व विराट कोहली करेल. भारताच्या संघाची निवड जरी २ आठवडे आधीच झाली असेल तरी निवड समितीने संघाच्या उपकर्णधार कोण असेल याचा खुलासा केला नव्हता. तरी पण सूत्रांमध्ये अशी चर्चा आहे की मुंबईत इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा भारताचा उपकर्णधार होऊ शकतो.

 

“निवड समितीने अजून तरी उपकर्णधाराची औपचारिक घोषणा केलेली नाहीये, पण त्यांनी अंतर्गत एका खेळाडूची निवड केली आहे, आणि जर गरज पडली तरच ते या नावावरचा पडदा उघडणार.” असे बीसीसीआयमधील एका सूत्राकडून खबर मिळाली आहे.

 

आधी जेव्हा रोहित शर्माला कर्णधारपदा बद्दल विचारण्यात आले तेव्हा रोहित म्हणाला “हा विचार खूप पुढचा आहे. मी एवढ्या पुढचा विचार करत नाही आणि जर भविष्यती अशी संधी आली तर मी नक्कीच स्विकारीन.”