आॅस्ट्रेलियाविरूद्ध हिटमॅन रोहित शर्मा करू शकतो कसोटीत पुनरागमन

जेव्हापासून विंडिजविरूद्धच्या दोन कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहिर झाला आहे, तेव्हापासून रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. एशिया कप 2018 स्पर्धेत कर्णधारपदाची जबाबदारी संभाळत रोहितने 5 सामन्यात 317 धावांची बरसात केली होती.

रोहित तांत्रिकदृष्ट्या खुप मजबूत फलंदाज आहे. उसळत्या खेळपट्यांवर तो आत्मविश्वासाने फलंदाजी करू शकतो. त्यामुळे त्याला आॅस्ट्रेलियाविरूद्धच्या 4 कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळू शकते. त्याच्यासाठी ती शेवटची संधी असू शकते. असे मुंबई मिररच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

रोहितची कसोटी कारकिर्द संघर्षपुर्ण राहिली आहे-

रोहितने आपले कसोटीतील पदार्पण 100 पेक्षा जास्त वन-डे सामने खेळल्यानंतर केले होते. 2013 साली विडिंजविरूद्ध केले होते. सचिन तेंडूलकरची ती शेवटची कसोटी मालिका होती.

त्या मालिकेत रोहितने 2 शतक ठोकली होती. त्यानंतर मात्र त्याला संघर्ष करावा लागला आहे. त्याने मागील पाच वर्षात फक्त  25 कसोटी सामने खेळले आहेत. या 25 सामन्यात त्याने 39.97 च्या सरासरीने 1479 धावा केल्या आहेत. त्याने 3 शतकांसहित 9 अर्धशतक केली आहेत.

21 नोव्हेंबरपासून चालू होणाऱ्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात भारत आपला पहिला कसोटी सामना 25 नोव्हेंबरला खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-