Results: राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील महिलांच्या उपउपांत्यपूर्व सामन्यांचे निकाल

हैद्राबाद । आज सकाळच्या सत्रात ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महिलांच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने बंगालचा ४१-२१ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आज संध्याकाळच्या सत्रात महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत.

सकाळी झालेल्या महिलांच्या उपउपांत्यपूर्व फेरीचे निकाल
बिहार १९ वि पंजाब ३३
कर्नाटक २३ वि छत्तीसगड २७
युपी ४५ वि ओडीसा १२
रेल्वे ३७ वि दिल्ली १९
हरियाणा २७ वि चंदीगड २४
महाराष्ट्र ४१ वि पश्चिम बंगाल २१
हिमाचल २३ वि तामिळनाडू २१
केरळ ३१ वि आंध्रप्रदेश २१