पाँटिंगच्या मते स्टीव्ह स्मिथ खेळत नसल्याने हा खेळाडू आहे सर्वोत्तम!

आॅस्ट्रेलियाचा माजी महान कर्णधार रिकी पाँटिंगने त्याच्या मते सध्या खेळत असलेल्या खेळाडूंपैकी जगातील सर्वोत्तम खेळाडू कोण आहे याबद्दल सांगितले आहे.

याविषयी cricket.com.au. शी बोलताना पाँटिंग म्हणाला, ” सध्या स्टीव्ह स्मिथ खेळत नसल्याने विराट कोहली सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे.”

पुढे पाँटिंग म्हणाला, “पण जर स्टीव्ह स्मिथ आत्ता खेळत असता तर मी त्याला अव्वल क्रमांकावर ठेवले असते. एवढा तो मला जबरदस्त वाटतो. मागील 3-4 वर्षांपासून त्याने जो खेळ केला आहे आणि नेतृत्व करताना त्याच्या फलंदाजीने आॅस्ट्रेलियाला अनेक विजयही मिळवून दिले आहेत. ”

यावर्षी अॅशेस मालिकेत स्मिथने 137.40 अॅव्हरेजने 687 धावा केल्या आहेत. त्याबद्दल पाँटिंग म्हणाला, “अॅशेसमध्ये त्याची सर्वोत्तम फलंदाजी बघायला मिळाली होती. अॅशेस सारख्या मोठ्या मालिकेत अशी कामगिरी करणे आणि तेही मालिकेच्या पहिल्या दिवशी, हे त्याच्या बद्दल खूप काही सांगते.”

स्मिथवर मार्च महिन्यात झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळल्याने क्रिकेट आॅस्ट्रेलियाने 1 वर्षाची बंदी घातली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

-मैदानात पाऊल ठेवताच किंग कोहलीच्या नावावर विराट विक्रम

-भारताकडून या खेळाडूने केले वनडे पदार्पण

-भारतीय महिला क्रिकेटर सरावाला नकोच म्हणतात, मग नक्की संघ घडवायचा तरी कसा?