माजी विश्वविजेता कर्णधार रिकी पॉन्टिंग होणार प्रशिक्षक

सिडनी । ऑस्ट्रेलियाच्या टी२० संघाचा सहाय्यक प्रशिक्षक एका टी२० मालिकेसाठी म्हणून माजी जगजेत्ता कर्णधार रिकी पॉन्टिंगची नियुक्ती झाली आहे. ही मालिका पुढच्या महिन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध होणार आहे.

या मालिकेत रिकी पॉन्टिंग मुख्य प्रशिक्षक डॅरेन लेहमनचा सहाय्यक म्हणून जबाबदारी पार पडणार आहे.

लेहमन यांनी यापूर्वीच आपण २०१९ नंतर जेव्हा करार संपेल तेव्हा तो पुढे कायम ठेवायला नकार दिला आहे. याचकारणामुळे पॉन्टिंगकडे लेहमनचे वारसदार म्हणून पाहिले जात आहे.

पॉन्टिंगने गेल्यावर्षी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी२० मालिकेत अशी जबाबदारी सांभाळली होती.

पॉन्टिंगने देशाकडून खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच दोन टी२० विश्वचषकात त्याने देशाची नेतृत्वाची धुरा वाहिली होती.

या निवडीबद्दल पॉन्टिंगने आनंद व्यक्त केला आहे.