धोनीने जे करुन दाखवलं तेच आज रिषभ पंतने पुन्हा केलं

भारत आणि विंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना हैद्राबाद येथे चालू आहे. सकाळच्या सत्रात भारतीय संघ सर्वबाद झाला. प्रथमत: रहाणेला जेसन होल्डरने बाद केले. त्याच षटकात होल्डरने जडेजाला पायचित पकडले.

त्यानंतर गॅब्रियलने रिषभ पंतला हेटमायरकडे झेल देण्यास भाग पाडले. रिषभने 92 धावा केल्या.

रिषभला सलग दुसऱ्या डावात शतकाने हुलकावणी दिली आहे. रिषभने मागील तीन डावांत 90 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.  भारतीय संघाच्या इंग्लड दौऱ्यातील शेवटच्या कसोटीत रिषभने शतकी खेळी केली होती. त्यानंतर विंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 92 धावांची खेळी केली होती. सध्या चालू असलेल्या कसोटीत तो 92 धावांवर बाद झाला आहे.

सलग दोन डावात नव्वदीत बाद होणार रिषभ पंत हा राहुल द्रविडनंतर दुसरा भारतीय  फलंदाज ठरला आहे. राहुल द्रविडने 1197 मध्ये श्रीलंकेविरूद्ध सलग दोन डावात नव्वदीत (92, 93)बाद झाला होता.

रिषभ हा कसोटीत दोनदा 92 धावांवर बाद होणारा महेद्रसिंग धोनीनतंर दुसराच भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात भारतीय संघाच्या 8 बाद 339 धावा झाल्या आहेत. आर अश्विन (11) आणि उमेश यादव(2) धावांवर खेळत आहेत. भारताकडे सध्या 28 धावांची नाममात्र आघाडी आहे.

महत्वाच्या बातम्या-