रिषभ पंतने केला टीम पेनचा कालचा हिशोब चुकता, पहा व्हिडीओ

मेलबर्न। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात आज चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 5 बाद 138 धावा केल्या आहेत. त्यांना अजून विजयासाठी 261 धावांची गरज आहे.

तत्पूर्वी भारताने दुसरा डाव 8 बाद 106 धावांवर घोषित करत ऑस्ट्रेलियासमोर पहिल्या डावातील 292 धावांच्या आघाडीसह 399 धावांचे विजयासाठी आव्हान ठेवले.

पंतने केला हिशोब चुकता- 

काल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने रिषभ पंतला फलंदाजी करताना स्लेज करुन त्रस्त केले होते. त्याचा हिशोब आज पंतने व्याजासहीत केला.

जेव्हा ५वी विकेट पडली आणि पेन फलंदाजीसाठी आला तेव्हा पंतने लगेच यष्टीमागून स्लेज करणे सुरु केले.

यावेळी पंत सतत पेनला डिवचताना दिसला. “कमऑन बाॅईज, आपल्याकडे एक खास पाहुणा आला आहे. तो काही करत नाही. मयांक तुला टेम्पररी कर्णधार माहीत आहे का?  पेनचा हा स्पेशल अपरेन्स आहे. त्याला विशेष काही करता येत नाही. तो फक्त बडबड करतो. ” असे यावेळी पंत म्हणताना दिसला.

महत्त्वाच्या बातम्या:

जगातील सर्वच कर्णधारांसाठी हे वर्ष ठरले अतिशय खराब

रोहितचा नादच खुळा! या कारणामुळे आहे टीम इंडियासाठी लकी

Video: कर्णधार टिम पेनची बडबड थांबेना, आता रिषभ पंतला केले टार्गेट