रिषभ पंत, कुलदीप यादव करत आहेत अशा अनोख्या प्रकारे सराव, पहा व्हिडिओ

पोर्ट ऑफ स्पेन।  वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात आज(11 ऑगस्ट) दुसरा वनडे सामना क्विन्स पार्क ओव्हल स्टेडीयमवर होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने यष्टीरक्षणाचा सराव करतानाचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की रिषभ हॉटेलच्या कॉरिडोरमध्ये यष्टीरक्षणाचे ग्लव्हज घालून चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचे चेंडू पकडण्याचा सराव करत आहेत. रिषभ आणि कुलदीपचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओला रिषभने कॅप्शन दिले आहे की ‘कुठे? कधी ? काय ? कोण? ….क्षमस्व नाही(नो सॉरी) … फक्त मला माहित आहे “का”‘

रिषभ भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात एमएस धोनीच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे.

रिषभची या दौऱ्याची सुरुवात खराब झाली होती. त्याने वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या दोन टी20 सामन्यात अनुक्रमे 0 आणि 4 धावा केल्या होत्या. पण त्याने तिसऱ्या टी20 सामन्यात चांगली कामगिरी करताना नाबाद 65 धावांची खेळी केली आणि भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

आता या टी20 मालिकेनंतर सुरु झालेल्या वनडे मालिकेत रिषभ कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

आज मैदानात उतरताच ‘यूनिवर्स बॉस’ ख्रिस गेलच्या नावावर होणार हा मोठा विक्रम

भारत-वेस्ट इंडीज संघात आज होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्याबद्दल सर्वकाही…

न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरने आयपीएलबद्दल केले मोठे भाष्य