रिषभ पंतचा नादच खुळा! आज पुन्हा धोनीचा कसोटी क्रमवारीचा विक्रम मोडला

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत उत्तम कामगिरी करणारा भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने ताज्या आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

पंतने 21 क्रमांकाने उडी घेत 17व्या क्रमांकावर पोहचला आहे. ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होण्यापूर्वी तो 59व्या क्रमांकावर होता.

यावेळी पंतचे 673 गुण झाले असून त्याने यष्टीरक्षक एमएस धोनीला मागे टाकले आहे. धोनीची सर्वोत्तम आयसीसी क्रमवारी 19 असून त्याचे 662 गुण होते.

भारतीय संघामधून पंतच्या आधी फारुख इंजिनीयर हे 1973ला आयसीसी क्रमवारीत 17व्या क्रमांकावर पोहचले होते. त्यांचे 619 गुण होते.

पंतने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत 58.33च्या सरासरीने 350 धावा करताना यष्टीमागे 20 झेलही घेतले आहेत. सिडनी कसोटी सामन्यात त्याने नाबाद 159 धावांची खेळी केली होती. या मालिकेत तो सर्वोत्तम धावा करणारा चेतेश्वर पुजारा नंतरचा दुसरा फलंदाज ठरला आहे. पुजाराने 521 धावा केल्या आहेत.

याआधी पंतने इंग्लंड कसोटी दौऱ्यातही शतक केले होते. यामुळे तो ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये कसोटीमध्ये शतक करणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

गुरुजी शास्त्रींचं पुन्हा धाडसी विधान, ऐकून व्हाल अवाक्

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम बनत आहे भारतात

युवराज सिंगला टीम इंडियात परतण्याचा मार्ग सापडला