कसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी

नाॅटिंगघम | भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना १८ आॅगस्टपासून ट्रेंट ब्रीज येथे सुरु होत आहे. भारतीय संघाल पहिल्या कसोटी सामन्यात केवळ ३१ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले तर दुसऱ्या कसोटीत संघाचा दारुण पराभव झाला.

सध्या संघ मालिकेत ०-२ असा पिछाडीवर आहे.

या सामन्यात भारताकडून रिषभ पंत पदार्पण करत आहे. भारताकडून कसोटीत पदार्पण करणारा तो ५वा सर्वात तरुण यष्टीरक्षक ठरला आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सफेद रंगाची जर्सी घालणारा तो केवळ २९१वा भारतीय खेळाडू आहे.

त्याला यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या जागी संधी देण्यात आली आहे. त्याला कर्णधार विराट कोहलीने पदार्पणाची कॅप दिली.

पंतचे सध्या वय २० वर्ष आणि ३१८ दिवस आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही याच दिवशी १० वर्षांपुर्वी श्रीलंकेत वनडे पदार्पण केले होते.

भारताकडून यष्टीरक्षक म्हणुन सर्वात कमी वयात करण्याचा विक्रम पार्थिव पटेलच्या नावावर आहे. त्याने १७ वर्ष आणि १५२ दिवसांचा असताना कसोटी पदार्पण केले होते. रिषभपेक्षा कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम दिनेश कार्तिक (१९ वर्ष १५५ दिवस), बुधी कुंदरन (२० वर्ष आणि ९१ दिवस) आणि अजय रात्रा (२० वर्ष आणि १२७) यांनी केले आहे.

त्याने गेल्याच महिन्यात द्रविड प्रशिक्षक असलेल्या  इंडिया अ कडून खेळताना इंग्लंड लायन्सविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. तसेच त्याला संधी देण्याबद्दल मोठी चर्चा होती. फेब्रुवारी २०१७ला भारताकडून टी२०मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या या खेळाडूला वनडे आणि कसोटीत मात्र दीड वर्ष वाट पहावी लागली. गेल्या चार सामन्यात त्याने नाबाद ३४, ६१, नाबाद ६७ आणि नाबाद ६४ अशा खेळी केल्या आहेत. या सर्व खेळी त्याने इंग्लंडमध्येच केल्या आहेत हे विशेष.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार

एशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर