२९ चेंडूत ० धावा…. रिषभ पंतचा अजब कारनामा

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद 6 धावा केल्या आहेत. तर भारताने पहिल्या डावात 27 धावांनी आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या दिवशी भारताकडून चेतेश्वर पुजाराने शतक करत तर इंग्लंडकडून मोईन अलीने 5 विकेट्स घेऊन हा दिवस गाजवला.

भारताची स्थिती काल नाजुक झालेली असताना फलंदाजीला आलेल्या रिषभ पंतने मात्र मोठी निराशा केली.

अजिंक्य रहाणे बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या पंतने २० धावांची पुजारा बरोबर भागीदारी केली परंतु यातील एकही धाव त्याची नव्हती.

तो २९ चेंडूत ० धावा करुन बाद झाला. त्याला मोईन अलीने पायचीत केले.

याबरोबर पंतच्या नावावर एक नकोसा असा विक्रमही जोडला गेला.

० धावेवर बाद होताना सर्वात जास्त चेंडू खेळलेला तो इरफान पठाण आणि सुरेश रैनाबरोबर संयुक्तरित्या पहिला फलंदाज बनला.

इरफान पठाणने २००५मध्ये बेंगलोर कसोटीत पाकिस्तान विरुद्ध २९ चेंडूत शुन्य धावा केल्या होत्या. तर असाच कारनामा सुरेश रैनाने इंग्लंडविरुद्ध ओव्हला २०११मध्ये केला होता.

जाॅफ्रे अॅलोट या न्युझीलंडच्या फलंदाजाने तब्बल ७७ चेंडू खेळुनही त्याला एकही धाव न करता तंबुत परतावे लागले होते. तर इंग्लंडच्याच जेम्स अॅंडरसनला २०१५ला श्रीलंकेविरुद्ध ५५ चेंडूत भोपळा फोडता आला नव्हता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाचे दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले

एशियन गेम्सचा पाॅकेटमनी सीमा पुनीया देणार केरळमधील महापूर ग्रस्तांना

तीन एशियन गेम्समध्ये पदक मिळवणारा तो ठरला पहिलाच भारतीय बॉक्सर

भारताचे २०२० आॅलिंम्पिक स्पर्धेतील एक सुवर्णपदक पक्के! जाणुन घ्या का?