रीशांक देवाडीगाच्या नावे होणार हा मोठा विक्रम

प्रो कबड्डी मधील पहिल्या चार मोसमात यु मुंबाचा महत्वाचा रेडर रिशांक देवाडिगा या मोसमामध्ये यु.पी.योद्धा संघाचा खेळाडू आहे. रिशांक यु मुंबाचा नियमित खेळाडू होता जेव्हा सलग तीन वर्षे यु मुंबा अंतिम फेरीत पोहचली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या मोसमात रिशांकने खूप चांगला खेळ केला. यु मुंबाला अंतिम सामन्यात पोहचवण्यात रिशांकचा खूप मोठा वाटा होता.

तिसऱ्या मोसमात रिशांकने रेडींगमध्ये १०० पेक्षा जास्त गुण मिळवले होते. एका डु ऑर डाय रेडरने केलेली ही प्रो कबड्डीमधील सर्वोत्कृष्ठ कामगिरी होती. चौथ्या मोसमात देखील त्याने ७० रेडींग गुण मिळवले होते. चौथ्या मोसमात यु मुंबाला सेमी फायनलमध्येदेखील पोहचता आले नव्हते.

रिशांकने आज यु.पी.योद्धासाठी खेळताना जर रेडींगमध्ये ६ गुण मिळवले तर तो ३०० रेडींग गुणांचा आकडा गाठेल. जर त्याने ३०० रेडींग गुण मिळवले तर तो अशी कामगिरी करणारा सहावा खेळाडू ठरू शकतो.

याअगोदर अशी कामगिरी राहुल चौधरी, अनुप कुमार, काशीलिंग आडके, दीपक निवास हुड्डा आणि अजय ठाकूर या खेळाडूंनी केली आहे.