तो खास विक्रम करणारा केवळ दुसरा महाराष्ट्रीयन खेळाडू होण्याची रिशांकला आज संधी

चेन्नई | आज प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचा दुसरा दिवस. यात पहिला सामना पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टीलर्स तर दुसरा सामना तमिल थलाईवाज विरुद्ध युपी योद्धाज असे सामने आहेत.

यातील दुसऱ्या सामन्यात युपी योद्धाजचा कर्णधार रिशांक देवाडिगाला खास विक्रम करण्याची संधी आहे. प्रो कबड्डीत एकूण ५०० गुण घेणारा ७वा खेळाडू होण्याची संधी रिशांकला आहे.

रिशांकने आजपर्यंत ८० सामने खेळले असून त्यात ४४९ गुण रेडिंग तर ४१ गुण डिफेंन्समध्ये घेतले आहे. त्याचे सध्या एकूण गुण ४९० असून तो काशिलिंग अडके (५२८) नंतर ७व्या स्थानी आहे.

प्रो कबड्डीत यापुर्वी केवळ काशिलिंंग अडके या महाराष्ट्राच्या एकमेव खेळाडूने ५०० गुण घेतले आहे. त्यामुळे या यादीत अव्वल स्थानी येण्याची रिशांकला संधी आहे.

प्रो कबड्डीत सर्वाधिक गुण कमावणारे खेळाडू

७१०- राहुल चौधरी (सामने- ७९ )

६४३- परदीप नरवाल (सामने- ६५)

५७७- दिपक हुडा (सामने- ८१)

५६३- अजय ठाकूर (सामने-८१ )

५४६- अनुप कुमार (सामने- ७८)

५२८- काशिलिंग अडके (सामने- ७२ )

४९०- रिशांक देवाडिगा (सामने- ८०)

महत्त्वाच्या बातम्या-

…तरच भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत वन-डेत येणार अव्वल स्थानी

PBL 2018: प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये भारतीय खेळाडू मालामाल

आसीसीच्या त्या नियमाने कर्णधार विराट कोहली वैतागला