रितू फोगटची २३ वर्षांखालील स्पर्धेसाठी निवड

पुढच्या महिन्यात पोलंडला होणाऱ्या २३ वर्षांखालील कुस्ती  चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी रितू फोगटची निवड झाली आहे. या स्पर्धेत तिच्यासह आणखी ७ खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या स्पर्धेसाठीची निवड खेळाडूंची चाचणी घेतल्यानंतर करण्यात आली आहे.

नोव्हेंबर २०१६ मध्ये रितू फोगट सिंगापुरमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पिअनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकली होती. त्याचबरोबर डिसेंबर २०१६ मध्ये ती प्रो रेसलिंग लीगमध्ये सगळ्यात महागडी महिला खेळाडू ठरली होती. तिला जयपूर निन्जाझ फ्रॅन्चायझीने ३६ लाख रुपये मोजले होते.

२३ वर्षांखालील कुस्ती चॅम्पियन स्पर्धेचा संघ:
रितु फोगट (४८ किग्रॅ), पिंकी (५३ किग्रॅ), ललिता (५५ किग्रॅ), संगीता (५८ किग्रॅ), सरिता (६० किग्रॅ), रेशमा माने (६३ किग्रॅ), दिव्या करण (६९ किग्रॅ) आणि पूजा (७९किग्रॅ).