बापरे! केवळ ८७ सेकंदात जडेजाने टाकले ६ चेंडू

मेलबर्न। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात आज चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 3 बाद 82 धावा केल्या आहेत. त्यांना अजून विजयासाठी 355 धावांची गरज आहे.

तत्पूर्वी भारताने दुसरा डाव 8 बाद 106 धावांवर घोषित करत ऑस्ट्रेलियासमोर पहिल्या डावातील 292 धावांच्या आघाडीसह 399 धावांचे विजयासाठी आव्हान ठेवले.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील २०वे षटत जडेजाने चक्क १ मिनीट आणि २७ सेकंदात पुर्ण केले. त्याने या षटकात केवळ पहिल्या चेंडूवर धाव दिली. त्यानंतर शाॅन मार्शने पुढील ५ चेंडूवर एकही धाव घेतली नाही.

जडेजा आधी षटक टाकलेला मोहम्मद शमी हा यावेळी केवळ फाईन लेगला क्षेत्ररक्षणासाठी गेला आणि परत लगेच गोलंदाजीला आला.

त्यानंतर जडेजाने पुन्हा डावातील २२वे षटकही जवळपास असेच टाकले.

जडेजा हा गरज असेल तेव्हा हमखास विकेट मिळवुन देणारा गोलंदाज म्हणून ओळखला जातो. तसेच जडेजा जर मर्यादीत षटकांत गोलंदाजी करत असेल तर कर्णधाराला षटकांची गती राखण्याचे कोणतेही टेन्शन नसते. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीप्रमाणेच रविंद्र जडेजा अतिशय कमी वेळात षटक पुर्ण करण्यासाठी ओळखला जातो.

महत्त्वाच्या बातम्या:

जगातील सर्वच कर्णधारांसाठी हे वर्ष ठरले अतिशय खराब

रोहितचा नादच खुळा! या कारणामुळे आहे टीम इंडियासाठी लकी

Video: कर्णधार टिम पेनची बडबड थांबेना, आता रिषभ पंतला केले टार्गेट