व्हिडिओ: विराट कोहलीने असे केले ५०वे आंतरराष्ट्रीय शतक साजरे

कोलकाता । विराट कोहली हा जगातील एक परिपूर्ण फलंदाज आहे हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. विराटच्या आज केलेल्या ५०व्या आंतरराष्ट्रीय शतकामुळे तो पुन्हा एकदा संघासाठी किती महत्वाचा खेळाडू आहे हे अधोरेखित झाले.

२९वर्षीय विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ८वे स्थान मिळवले आहे.

त्याच्या पुढे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर(१००), रिकी पॉन्टिंग(७१), कुमार संगकारा(६३), जॅक कॅलिस(६२), हाशिम अमला(५४), महेला जयवर्धने(५४) आणि ब्रायन लारा(५३) हे खेळाडू आहेत.

आपल्या १८व्या कसोटी शतकानंतर ह्या खेळाडूने अनोख्या पद्धतीने आनंद व्यक्त केला. पूर्वी विराट शतकी खेळी केल्यावर जसा आनंद व्यक्त करत असे काहीसा तसाच आनंद त्याने यावेळीही व्यक्त केला. त्याच्या या खास अंदाजाची ट्विटर तसेच अन्य सोशल माध्यमांवर चांगलीच चर्चा झाली.