स्वत:च्या सपोर्ट स्टाफची निवड करण्यास प्रशिक्षकांना परवानगी द्यावी: रॉबिन सिंग

चेन्नई: भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्याचा सपोर्ट स्टाफ निवडण्याची परवानगी त्याना मिळालीच पाहिजे. रविवारी शास्त्रीच्या या वक्तव्याला माजी भारतीय क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रॉबिन सिंग यांनी पाठिंबा दिला आहे.

2007-2009 मध्ये भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असलेले रॉबिन म्हणाले की, जर ते प्रशिक्षक असतील तर त्यांनीच त्याचा स्पोर्ट स्टाफ निवडला पाहिजे.

“माझ्या मते .. ज्या लोकांना मी ओळखत आहे, त्यांच्याबरोबर काम करायला मला आवडेल, तर मी ज्या लोकांना ओळखत नाही, जे लोक मला माहित नाहीत अशा लोकांबरोबर काम करायला मला आवडणार नाही. हे खूप सरळ आणि साध मत आहे” असे ते म्हणाले.

टीएनपीएलमधील कराईकुडी कालाई संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले रॉबिन सिंग यांनी संवाद साधताना सांगितले की, ज्या लोकांबरोबर आपली समज आहे आणि ज्यांना आपण निष्कर्ष काढू शकतो अश्याच लोकांबरोबर काम करावे असे त्यांचे मत आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) गोलंदाज आणि फलंदाजी सल्लागार म्हणून झहीर खान आणि राहुल द्रविड यांची निवड केली आहे. तर भरत अरुणचं नाव रवी शास्त्रींच्या पसंतीच्या स्टाफच्या यादीत आहे.

बीसीसीआयने हेड कोचची निवड प्रक्रिया योग्य पद्धतीने हाताळली आहे का, असे विचारले असता रॉबिन म्हणाले, “मी त्यास उत्तर देण्यास सक्षम नाही.” रॉबिन सिंगही विराट कोहली-अनिल कुंबळेच्या वादावर टिप्पणी करू इच्छित नव्हते.