विम्बल्डन: रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत

0 68

सात वेळचा विम्बल्डन विजेता रॉजर फेडररने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. बेबी फेडरर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेराव्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हला फेडररने ६-४, ६-२,६-४ असे पराभूत केले. फेडररला स्पर्धेत तृतीय मानांकन असून दिमित्रोव्हला १३वे मानांकन होते.

१ तास ३८ मिनिट चाललेल्या सामन्यात फेडररने दिमित्रोव्हला पराभूत केले. फेडररचा हा ८८ वा विम्बल्डनमधील विजय असून हा विम्बल्डनमधील विक्रमी विजय आहे.

ही फेडररची ७० ग्रँडस्लॅम स्पर्धामंधील ५०वी उपांत्यपूर्व फेरी आहे, तर १५वी विम्बल्डन उपांत्यपूर्व फेरी आहे. १५ विम्बल्डन उपांत्यपूर्व फेरींपैकी ७व्यांदा फेडरर एकही सेट न गमावता उपांत्यफेरीत पोहचला आहे.

विम्बल्डन उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा फेडरर हा दुसरा सर्वात जास्त वयस्कर खेळाडू आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: