विम्बल्डन: रॉजर फेडररच्या कारकिर्दीत १०००० बिनतोड सर्विस

0 77

महान टेनिसपटू रॉजर फेडररने विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. पहिल्याच सामन्यात अलेक्साण्डर डॉगोपोलॉवने दुखापतीमुळे फेडरर विरुद्ध दुसऱ्या सेटनंतर माघार घेतली. त्यामुळे फेडरर विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत पोहचला.

परंतु डॉगोपोलॉव विरुद्ध खेळताना फेडररने आज विक्रमी १०००० वी बिनतोड सर्विस केली आहे. अशी कामगिरी करणारा तो टेनिस विश्वातील केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे.

सर्वात जास्त बिनतोड सर्विस करण्याचा विक्रम हा इवो कार्लोविक याच्या नावावर असून त्याने ६१८ सामन्यांत तब्बल १२०१८ बिनतोड सर्विस केल्या आहेत. हा ३८ वर्षीय खेळाडू सध्या जागतिक क्रमवारीत २३व्या क्रमांकावर आहे.

या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर गोरान इव्हानीसेविक हा खेळाडू असून त्याने ७३१ सामन्यात १०१३१ बिनतोड सर्विस केल्या आहेत. क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर जाण्यासाठी फेडररला आता केवळ १३२ बिनतोड सर्विसची गरज आहे.

सर्वात जास्त बिनतोड सर्विस करणारे खेळाडू
१२०१८ इवो कार्लोविक
१०१३१ गोरान इव्हानीसेविक
१०००० रॉजर फेडरर

Comments
Loading...
%d bloggers like this: