का देतो रॉजर फेडरर बॉलबॉयला पिझ्झा पार्टी?

काल स्विझर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर बेसल ओपन स्पर्धा जिंकला आणि त्यानी नेहमीप्रमाणे सगळ्या बॉलबॉयला पिझ्झा पार्टी दिली. तो आत्तापर्यंत ११ वेळा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि त्या प्रत्येक वेळेस त्याने ही पिझ्झा पार्टीची प्रथा कायम ठेवली आहे.

बेसल हे फेडररचे घरेलू मैदान आहे. या मैदानावरवर तो वयाच्या ११ व्या वर्षी बॉलबॉय होता. तेव्हा तो सायकलवर या मैदानावर यायचा. त्याचवेळेस या स्पर्धेच्या ११९३ सालच्या अंतिम फेरीतील मिचेल स्टिच विरुद्ध स्टीफन एडबर्ग यांच्या सामन्यादरम्यानही तो बॉलबॉय होता.

फेडरर म्हणतो,” मी तेव्हाही बॉलबॉय होतो आणि मी कायमच असेल. त्यामुळेच तो जेव्हाही इथे जिंकतो किंवा पराभूत होतो तेव्हा तो सगळ्या बॉलबॉयला पिझ्झा पार्टी देतो आणि स्वतःसुद्धा या पार्टीत सामील होतो. ही पिझ्झा पार्टी म्हणजे त्या सगळ्या बॉलबॉयसाठी एक आनंदाची पर्वणी असते.”

फेडरर म्हणतो,” ही मुले मुली सुद्धा मला मेडल देतात जेव्हा मी त्यांना पिझ्झा पार्टी देतो. जी माझ्यासाठी एक आठवण असते आणि ती मला प्रत्येक वेळेस मिळते. मी ती जपून ठेवतो.”

फेडरर या मुलांना संदेश देतो की मी सुद्धा तुमच्यासारखाच होतो आणि एकदिवस तुम्हीसुद्धा मोठे व्हाल प्रसिद्ध व्हाल. तुमच्या सगळ्यांचे मला मदत केल्याबद्दल धन्यावाद.

फेडररने काल डेल पेट्रो विरुद्ध खेळताना त्याच्या कारकिर्दीतील ९५ वे विजेतेपद मिळवले आहे.