विम्बल्डन: रॉजर फेडरर दुसऱ्या फेरीत…

सात वेळचा विम्बल्डन विजेता रॉजर फेडररने काल २०१७ विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. अलेक्साण्डर डॉगोपोलॉवने दुखपतीमुळे दुसऱ्या सेटमध्ये माघार घेतली. तेव्हा फेडरर ६-३, ३-० असा आघाडीवर होता.
फेडररचा हा विम्बल्डनमधील ८५वा विजय ठरला. या विजयाबरोबर फेडरर विम्बल्डनमध्ये एकेरीत सार्वधिक विजय मिळवणारा टेनिसपटू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम महान टेनिसपटू जिमी कॉनर्स यांच्या नावावर होता. त्यांनी विम्बल्डनमध्ये एकेरीत ८४ विजय मिळवले आहेत.

यावर्षीच्या सुरुवातीला फेडररने १४ ग्रँडस्लॅम विजेत्या नदालला ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत करून १८वे ग्रँडस्लॅम जिंकले होते. सध्या जागतिक क्रमवारीत ५व्या स्थानी आणि स्पर्धेत तिसरं मानांकन मिळालेला फेडरर चांगल्याच फॉर्ममध्ये आहे.