विक्रमवीर फेडरर: बेसेल ओपन जिंकून फेडररने केले हे विक्रम

बेसेल । येथे झालेली एटीपी वर्ल्ड टूर ५०० प्रकारातील स्पर्धा जिंकून रॉजर फेडररने यावर्षी एकूण ७ विजेतेपद मिळवली. डेल पोट्रोला अंतिम सामन्यात ६-७, ६-४, ६-३ असे पराभूत करत आपल्या घराची ही स्पर्धा त्याने तब्बल ८व्यांदा जिंकली.

या विजेतेपदासह फेडररने केलेले हे विक्रम…

-रॉजर फेडररचे बेसेल ओपनच हे ८वे विजेतेपद

-रॉजर फेडरर यावर्षी ८ अंतिम फेरीचे सामने खेळला आहे.

-रॉजर फेडररचा हा १४४ वा अंतिम फेरीचा सामना आहे. त्यात त्याने ९५ विजेतेपद मिळवली आहेत तर ४९वेळा तो उपविजेता ठरला आहे.

-बेसेल ओपनमधील फेडररची ही १३वी अंतिम फेरी होती. ज्यात त्याने ८ विजेतेपदं मिळवली आहेत तर पाच तो उपविजेता राहिला आहे.

-या मोसमात फेडररने ७ विजेतेपदं मिळवली आहेत तर १ उपविजेपदही त्याच्या नावावर आहे.

-ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन, इंडियन वेल्स, मियामी ओपन, हॅले ओपन, रोलेक्स शांघाय मास्टर्स १००० आणि बेसल ओपन या स्पर्धा फेडररने यावर्षी जिंकल्या आहेत.

-रॉजर फेडररचा हा हार्ड कोर्टवरील ७०५वा विजय आहे.

-यावर्षी फेडररने २ ग्रँडस्लॅम, ३ एटीपी मास्टर्स १००० आणि २ एटीपी वर्ल्ड टूर ५०० जिंकली आहे.

-फेडररचे हे ९५वे विजेतेपद आहे. याबरोबर ओपन इरामध्ये सर्वाधिक विजेतेपद मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो इवान लेंडल(९४) यांना मागे टाकत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. पहिल्या स्थानावर जिमी कोंनॉर्स आहेत. त्यांनी १०९ विजेतेपद जिंकली आहेत.

-रॉजर फेडरर या मोसमात क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंमध्ये असलेल्या खेळाडूंकडून ११ पैकी केवळ एकदा पराभूत झाला आहे. त्याला रॉजर्स कप स्पर्धेत अलेक्झांडर झवेरवने पराभूत केले होते.