विम्बल्डन: रॉजर फेडरर उपांत्य फेरीत

रॉजर फेडरर विम्बल्डन २०१७ च्या उपांत्यफेरीत पोहचला आहे. त्याने मिलोस राओनिकला उपांत्यपूर्व फेरीत सरळ सेटमध्ये ६-४,६-२,७-६ असे पराभूत केले.

फेडररला स्पर्धेत तृतीय मानांकन आहे तर कॅनडाच्या मिलोस राओनिकला ६वे मानांकन होते. गेल्यावर्षी मिलोस राओनिककडूनच फेडरर उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. फेडररने कारकिर्दीमध्ये बाराव्यांदा विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली.

पहिले दोन सेट ६-४, ६-२ असे जिंकल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये फेडररला थोडा संघर्ष करावा लागला. टायब्रेकमध्ये फेडररने राओनिक ७-६(७-४) असे पराभूत करत सरळ सेटमध्ये विजय मिळवला.

या विजयाबरोबर फेडररने या स्पर्धेत उपांत्यफेरीपर्यंत एकही सामना गमावलेला नाही. फेडररचा पुढील सामना ११व्या मानांकित थॉमस बर्डिचशी होणार आहे.