विम्बल्डन: बर्डिच फेडररसाठी ठरू शकतो धोकादायक खेळाडू!

0 66

रॉजर फेडरर आज विम्बल्डनची विक्रमी १२वी उपांत्यफेरीचा खेळणार आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. परंतु कारकिर्दीत फेडरर ज्या खेळाडूंविरुद्ध सर्वाधिक सामने हरला आहे त्यात टोमास बर्डिच या खेळाडूचाही समावेश होतो.

यापूर्वी फेडरर- बर्डिच २४ वेळा आमने-सामने आले असून त्यात फेडररने १८ तर बर्डिचने ६ सामने जिंकले आहेत. ज्या खेळाडूंनी फेडररला कारकिर्दीत सर्वाधिक वेळा हरवलं आहे त्यात बर्डिचचा ६वा क्रमांक लागतो.

त्यामुळे बर्डिच फेडररसाठी एक धोकादायक खेळाडू ठरू शकतो. सध्या बर्डिच ३१वयाचा असून त्याची जागतिक क्रमवारी आहे १५. त्यामुळे फेडररला बर्डिच विरुद्ध सावध खेळ करावा लागणार आहे.

फेडरर या खेळाडूंविरुद्ध सर्वाधिक सामने हरला आहे

२३ जोकोविच
२३ नदाल
११ मरे
९ हेविट
८ डेविड नैलबैंडियन
६ टोमास बर्डिच / त्सोन्गा / टीम हेन्मन

Comments
Loading...
%d bloggers like this: