Video: म्हणून रॉजर फेडरर जगातील सर्वोत्तम खेळाडूच नाही तर व्यक्ती देखील आहे

स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर हा सध्या ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेचा गतविजेता असलेल्या फेडररने आत्तापर्यंत 20 ग्रॅंड स्लॅम जिंकले आहेत. तो पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा टेनिसपटू आहे. मात्र असे असले तरी त्यालाही सर्वसामान्यांसारखे नियमांचे पालन करावे लागते. हेच एका घटनेतून दिसून आले आहे.

झाले असे की सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत फेडररजवळ एक्रिडेशन कार्ड नसल्याने त्याला सुरक्षारक्षकाने रोखले होते. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियन ओपनने त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून शेअर केला आहे.

या व्हिडिओत दिसते की फेडररकडे एक्रिडेशन पास (मान्यता पत्र) नसल्याने त्याला प्रवेश करत असताना त्याला सुरक्षारक्षकाने रोखले. तो ही कार्ड नसल्याने थांबून राहिला. नंतर त्याचा कोचींग स्टाफ आल्यावर फेडररने सुरक्षारक्षकाला त्याचे एक्रिडेशन कार्ड दाखवल्यावर त्याला प्रवेश करण्यास मान्यता देण्यात आली.

फेडरर आणि त्या सुरक्षारक्षकाने दाखवलेल्या वागणुकीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

आज (19 जानेवारी) फेडरर मेलबर्न येथे सराव सामना खेळणार आहे. तर उद्या (20 जानेवारी) त्याचा चौथ्या फेरीतील सामना ग्रीकच्या स्टिफॅनोस सित्सीपस विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

या संघांमध्ये होणार आहेत रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीचे सामने

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकासाठी अशी आहे टीम इंडिया

कर्णधार कोहलीने केले एमएस धोनीचे तोंडभरुन कौतुक, चाहतेही ऐकुन होतील खुश