रॉजर फेडरर रेड वाइन प्रमाणे आहे: युवराज सिंग

0 87

रॉजर फेडररचे जसे दिग्गज चाहते आहेत तसे क्रिकेटपटू ही मागे नाहीत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, इंग्लंडचे क्रिकेटपटू तसेच भारतीय कर्णधार विराट कोहली सुद्धा फेडरर फॅन आहेत.

यात आता एका नव्या फेडरर फॅनची भर पडली आहे. तो दुसरा तिसरा कुणी नसून भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज आहे. काल युवराजने याबद्दल काल एक खास ट्विट केला आहे.

ज्यात युवराज फेडररला रेड वाइन असे संबोधतो. युवराज म्हणतो, ” किंग फेडरर, रॉजर फेडरर हा रेड वाइनप्रमाणे आहे. वयाप्रमाणे अजून चांगला बनत चालला आहे. चॅम्पियन!”


रॉजर फेडरर काल विक्रमी १२व्यांदा विम्बल्डनच्या उपांत्यफेरीत पोहचला आहे.

 

 

 

Comments
Loading...
%d bloggers like this: