Australian Open 2018: रॉजर फेडररचा सोपा विजय, चौथ्या फेरीत केला प्रवेश

मेलबर्न । स्पर्धेत दुसरे मानांकन असणाऱ्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने २९व्या मानांकित रिचर्ड गॅस्केटचा ६-२, ७-५, असा पराभव केला.

फेडररला या फेरीत विजयासाठी २९व्या मानांकित रिचर्ड गॅस्केटने चांगलाच घाम गाळायला लावला. पहिला सेट ३० मिनिटांत ६-२ असा जिंकणाऱ्या फेडररला पुढच्या सेटमध्ये मात्र गॅस्केटने चांगलेच झगडायला लावले. हा सेट फेडररने अखेर ७-५ असा जिंकला.

शेवटच्या सेटमध्येही दोन्ही खेळाडूंनी आपली सर्विस राखत ४-४ अशी बरोंबरी केली होती. अखेर गॅस्केटची सर्विस भेदत शेवटचा सेट ६-४ असा जिंकला.

फेडररचा हा गॅस्केटवरील हा १७ वा विजय असून गॅस्केटला फेडररविरुद्ध केवळ २ विजय मिळवता आले आहे. फेडररचा हा ऑस्ट्रेलियन ओपनमधील ९०वा विजय आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपउपांत्यपूर्व फेरीत १६व्यांदा प्रवेश केला आहे.

फेडररचा उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना एटीपी क्रमवारीत ८५व्या स्थानावर असणाऱ्या मार्तोन फुकडोविकस या खेळाडूबरोबर आहे.