Australian Open 2018मधील भारताचे आव्हान केवळ ह्या खेळाडूवर टिकून

0 165

मेलबर्न । ऑस्ट्रेलियन ओपन २०१८ ग्रँडस्लॅम स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून रोहन बोपण्णाने मिश्र दुहेरीत जोडीदार तिमिया बबोस बरोबर उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी अबीगेल स्पेअर्स आणि जुआन सेबास्टियन कबल जोडीवर ६-४, ७-६ असा विजय मिळवला आहे. हा सामना १ तास १५ मिनिटे चालला.

भारतीय खेळाडूंमध्ये अन्य कोणत्याही खेळाडूला या स्पर्धेत आपले आव्हान राखता आले नाही.

Comments
Loading...
%d bloggers like this: