रोहीत कुमारला रेडींगमधील मोठ्या विक्रमाची संधी

आज प्रो कबड्डीमध्ये पुणे लेगच्या चौथ्या दिवशी बेंगलूरु बुल्स आणि युपी योद्धा आमने सामने असतील. रविवारी या दोन संघात सामना झाला होता तो सामना बेंगलूरु बुल्स यांनी ३८-३२ असा जिंकला होता. हा सामना गमावून देखील युपी योद्धा संघाने प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे.

बेंगलूरु बुल्स संघाचा कर्णधार खिलाडी कुमार म्हणजेच रोहित कुमार हा आजच्या सामन्यात मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. रोहितने प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात २० सामन्यात खेळताना १९० गुण मिळवले आहेत. मागील सामन्याप्रमाणेच खेळ करत जर त्याने आजच्या सामन्यात सुपर टेन केला तर प्रो कबड्डीच्या एकाच मोसमात २०० गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव नोंदवले जाईल.

रोहितने या मोसमात प्रो कबड्डीमध्ये २० सामने खेळले आहेत. त्यात त्याने १९० गुण मिळवले आहेत. त्यातील १८० गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले आहेत तर उर्वरित गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवले आहेत.

यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-

# रोहित कुमार प्रो कबड्डीच्या तिसऱ्या मोसमात स्पर्धेतील सवोत्कृष्ट खेळाडू होता. पटणा पायरेट्सला त्यांचे पहिले-वाहिले विजेतेपद मिळवून देण्यात रोहीत कुमारचा खूप मोठा वाटा राहिला होता.

# रोहितने बेंगलूरु बुल्सच्या उर्वरित दोन्ही सामन्यात मिळून जरी १० गुण मिळवले तर तो एका मोसमात २०० गुण मिळवणारा खेळाडू ठरेल. त्याने जर दोन्ही सामन्यात सुपर टेन लागवल्या तर फक्त रेडींगमध्ये २०० गुण मिळवणारा देखील तिसरा खेळाडू बनेल.

 प्रो कबड्डीच्या एका मोसमात २०० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे खेळाडू.
१ प्रदीप नरवाल- २१ सामने, एकूण गुण २६७, रेडींग गुण २६७, डिफेन्समधील गुण ०
२ अजय ठाकुर -२२ सामने,एकूण गुण २२२,रेडींगमधील गुण २१३, डिफेन्समधील गुण ०९