रोहित कुमार उत्तम रेडर पण कर्णधार नाही- रणधीर सिंग

प्रो कबड्डीच्या पाचाव्या मोसमाच्या तिसऱ्या दिवशी बंगलुरू बुल्स आणि यूपी योद्धाज यांच्यातील सामन्यात बंगलुरूने यूपीला ६ गुणांनी मात दिली पण त्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी यूपीला ८ पेक्षा जास्त गुणांनी हरवणे गरजेचे होते. तसे करण्यात अपयश आल्यामुळे बंगलुरू बुल्स स्पर्धेतून बाहेर फेकली गेली आहे तर यूपी प्ले ऑफ्समध्ये जाणारा शेवटचा संघ बनला आहे.

एक वेळी सामन्यात बंगलुरूकडे १० गुणांची बढत होती. पण तरी सुद्धा रेडरच्या सुमार कामगिरीमुळे आणि सेल्फ आऊट झाल्यामुळे बंगलुरूने बढत गमावली.

प्रशिक्षक रणधीर सिंग यांना संघाच्या कामगिरी बद्दल विचारले असता ते म्हणाले ” आमच्या संघात रेडर आणि डिफेन्स दोन्ही चांगले आहे पण या मोसमात नशीबच आमच्याबरोबर नाही. आजच्या सामन्यात डिफेन्सने उत्तम कामगिरी केली पण रेडर्सने त्यांना साथ दिली नाही. आम्ही पुण्यासारख्या चषकाच्या दावेदार मानल्या जाणाऱ्या संघाला हरवले आहे त्यामुळे आमच्या संघात काहीच कमी नाही पण नशिबाने आम्हला साथ दिली नाही.”

अश्या तणावपूर्ण वातावरणात कर्णधाराच्या भूमिकेबद्दल विचारल्यानंतर रणधीर सिंग म्हणाले, ” रोहित हा एक उत्तम रेडर आहे पण त्याच्याकडे नेतृत्व गुण नाहीत. जेव्हा डू ओर डाय रेड नव्हती तेव्हा पण त्याने रिस्क घेऊन गुण मिळवण्याचे प्रयत्न केला आणि तो स्लेफ आऊट झाला. ज्याचा फरक शेवटच्या स्कोरमधील आपल्याला दिसतो.”