बंगळूरु बुल्सचा कर्णधार रोहित कुमारचा प्रो कबड्डीमध्ये मोठा पराक्रम

पुणे। प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात कालपासून ( २३ नोव्हेंबर) बंगळूरु बुल्स संघाचा लेग सुरु झाला आहे. बंगळूरु संघाचे हा लेग बंगळूरुमधून पुण्याला हलवण्यात आला असल्याने त्यांचे घरचे सामने आता शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्पेक्स, बालेवाडी येथे पार पडणार आहे.

त्यांचा काल या घरच्या लेगमधील पहिला सामना बेंगाल वॉरियर्स विरुद्ध पार पडला. या सामन्यात बंगळूरु बुल्सला ३१ – ३३अशा फरकाने पराभव स्विकारावा लागला. मात्र असे असले तरी या सामन्यात बंगळूरु बुल्सचा कर्णधार रोहित कुमारने खास विक्रम केला आहे.

त्याने या सामन्यात ९ गुण घेत प्रो कबड्डीमध्ये ५०० गुण पूर्ण करण्याचा टप्पाही पार केला आहे. असा पराक्रम करणारा तो एकूण ९ वा खेळाडू ठरला आहे. त्याने त्याच्या ५९ व्या सामन्यात हा पराक्रम केला आहे.

याआधी असा विक्रम राहुल चौधरी, परदीप नरवाल, अजय ठाकूर, दीपक निवास हुड्डा, अनुप कुमार, काशिलिंग अडके, रिशांक देवाडिगा आणि मनजित चिल्लर यांनी केला आहे.

प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक गुण घेणारे कबड्डीपटू-

७९१ – राहुल चौधरी (सामने)

७६७ – परदीप नरवाल

६७५ – अजय ठाकूर

६६८ – दीपक हुडा

५९२ – अनुप कुमार

५९१ – काशिलिंग अडके

५६२ – रिशांक देवाडिगा

५०४ – मनजित चिल्लर

५०३ – रोहित कुमार

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा-

प्रो कबड्डी २०१८: आजचा सामना पुणेरी पलटनसाठी ठरणार ऐतिहासिक

 ४७ वर्षीय भारतीय खेळाडूने हॅट्रिक घेत केला विश्वविक्रम

जाणून घ्या २०१९च्या आयपीएलसाठी कोणते संघ किती परदेशी खेळाडू खरेदी करु शकतात