जेव्हा १५ वर्षांचा क्रिकेटपटू खेळतो थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट

जागतीक क्रिकेटमध्ये सध्या युवा खेळाडू चमकत आहेत. तसेच ते नवनवीन विक्रमही रचत आहेत.

नुकतेच शुक्रवारी, 3 आॅगस्टला पार पडलेल्या नेदरलँड्स विरुद्ध नेपाळ यांच्यात वनडे सामना पार पडला. या सामन्यात नेपाळच्या 15 वर्षीय रोहित कुमार पौडेल या खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.

या पदार्पणाबरोबच त्याने एक खास विक्रम रचला आहे. तो वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा चौथ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. या सामन्याच्या दिवशी त्याचे वय 15 वर्षे दिवस इतके होते.

या यादीत अव्वल क्रमांकावर पाकिस्तानचे हसन रझा हे खेळाडू असून त्यांनी झिम्बाब्वे विरुद्ध 14 वर्ष 233 दिवस इतके वय असताना वनडेत पदार्पण केले होते.

तसेच या यादीत दुसऱ्या स्थानी 2013 मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध वनडे पदार्पण करणारा केनियाचा गुरदिप सिंग आहे. त्याने 15 वर्ष 258 दिवसांचा असताना हे वनडे पदार्पण केले होते.

या यादित तिसऱ्या स्थानी कॅनडाचा नितिश कुमार असुन त्याने 2010 मध्ये अफगाणिस्तान विरुद्धच वनडे पदार्पण केले होते. यावेळी त्याचे वय 15 वर्ष 273 दिवस होते.

या यादीत भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 9 व्या स्थानी आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध 18 डिसेंबर 1989 मध्ये 16 वर्ष 238 दिवस एवढे वय असताना वनडे पदार्पण केले होते.

रोहित कुमार हा उजव्या हाताचा फलंदाज आहे. तो शुक्रवारच्या सामन्यात 16 व्या षटकात 6 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. मात्र त्याचे हे पदार्पण खास झाले नाही. त्याने 15 चेंडूत फक्त 6 धावा केल्या. त्याला गोलंदाजाने बाद केले.

रोहितने अ दर्जाचे 13 सामने खेळले असून यात त्याने च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच त्याने एक ट्वेंटी20 सामना देखील खेळला आहे. मात्र त्याला यात फलंदाजी आणि गोलंदाजीची संधी मिळाली नाही.

नेपाळने प्रथम फलंदाजी करताना 216 धावा केल्या तर नेदरलँड्सला 215 धावात रोखण्यात त्यांना यश आल्याने हा सामना नेपाळने 1 धावेने जिंकला.

विशेष म्हणजे नेपाळची ही पहिलीच वनडे मालिका आहे.

वनडेमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारे खेळाडू-

14 वर्षे 233 दिवस (1996) – हसन रझा (पाकिस्तान)

15 वर्षे 258 दिवस (2013) – गुरदीप सिंग (केनिया)

15 वर्षे 273 दिवस (2010)- नीतीश रोनीक कुमार (कॅनडा)

15 वर्षे 335 दिवस (2018) – रोहित कुमार पौडल (नेपाळ)

16 वर्षे 127 दिवस (1988) अकिब जावेद (पाकिस्तान)

16 वर्षे 206 दिवस (2015) – योद्धीन पुंजा (संयुक्त अरब अमिराती)

16 वर्षे 215 दिवस (1996) – शाहिद अफ्रीदी (पाकिस्तान)

16 वर्षे 229 दिवस (2004) – रामवीर राय (संयुक्त अरब अमिराती)

16 वर्षे 238 दिवस (1989) – सचिन तेंडुलकर (भारत)

16 वर्षे 252 दिवस (2017) – मुजीब रहमान (अफगाणिस्तान)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटी मालिका बोरिंग ठरली असती परंतु विराटच्या त्या गोष्टीमुळे आता येणार मजा

टाॅप ५- इशांत शर्मा सुसाट, एकाच सामन्यात केले अनेक विक्रम

साहेबांच्या भूमीवर मराठमोळ्या स्म्रीती मानधनाचे वर्चस्व