केएल राहुल खेळणार ४थ्या क्रमांकावर

भारतीय निवड समितीची अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी प्रतिभावान कसोटीपटू केएल राहुल हा श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत चौथ्या क्रमांकावर खेळण्याचे संकेत दिले आहेत.

दुखापतीमधून सावरल्यानंतर केएल राहुल प्रथमच श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत खेळला आहे. जबदस्त कामगिरी करत त्याने गेल्या ७ कसोटी डावात ७ अर्धशतके केली आहेत. त्यामुळेच त्याची भारतीय एकदिवसीय संघात निवड झाली आहे.

“केएल राहुल हा अतिशय चांगला खेळाडू असून त्याला अकरा खेळाडूंच्या संघात स्थान देण्यात येईल. शिखर आणि रोहित शर्मा हे अतिशय चांगले खेळाडू आहेत. ” असे प्रसाद म्हणाले.