पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात

भारतीय संघाचे एशिया कप 2018 स्पर्धेत विजयी अभियान सुरुच आहे. काल (23 सप्टेंबर) झालेल्या एशिया कप स्पर्धेतील सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 9 विकेटने पराभव केला.

या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने दोन अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. सामन्यात 95 वी धाव घेताच रोहित हा वनडेत 7000 धावा करणारा 9 वा भारतीय फलंदाज ठरला आहे.

याआधी अशी कामगिरी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनी, विराट कोहली, मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंग आणि विरेंद्र सेहवागने केली आहे.

सुपर फॉर्ममध्ये असणाऱ्या रोहितने आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात वेगवान 7000 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही पाचवे स्थान मिळवले आहे. या यादीत दक्षिण अफ्रिकेचा हाशिम आमला अव्वल स्थानावर आहे. त्याने अवघ्या 150 डावात हा पराक्रम केला आहे.

त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने 161 डावात सात हजार धावा केल्या आहेत.तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या एबी डिविलियर्सने ही कामगिरी 166 डावात केली आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने174 डावात 7000 हजार धावा केल्या होत्या.

रोहितने ही कामगिरी 181 डावात केली आहे. सर्वात जलद 7000 हजार धावा करणारे पहिले पाचही खेळाडू भारत आणि दक्षिण अफ्रिकेचे आहेत.

भारतीय सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित वनडेत 5000 धावांचाही टप्पा पार केला आहे. असे करणारा तो फक्त चौथा भारतीय सलामीवीर फलंदाज आहे. याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विरेंद्र सेहवाग या सलामीवीरांनी हा कारनामा केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

तेंडुलकर-सेहवाग जोडीपेक्षा रोहित-शिखरची जोडी ठरली बेस्ट

टॉप ५: रोहित शर्माने शतकी खेळी करत घातली खास विक्रमांना गवसणी

एशिया कप २०१८: ४ दिवसांत पाकिस्तानचा टीम इंडियाकडून दोनदा