शतकवीर रोहित शर्माने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा बनला जगातील पहिलाच खेळाडू

लखनऊ। भारत विरुद्ध विंडीज संघात आज(6 नोव्हेंबर) दुसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने नाबाद शतक करताना विश्वविक्रम रचला आहे.

रोहितने या सामन्यात 61 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 7 षटकार मारले आहेत. हे रोहितचे आंतरराष्ट्रीय टी20 मधील चौथे शतक आहे.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20मध्ये चार शतके करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. आत्तापर्यंत असा पराक्रम कोणत्याही खेळाडूला करता आलेला नाव्हता.

या पराक्रमाबरोबरच रोहित आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता दुसऱ्या क्रमांकावर आला. तसेच तो भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज ठरला आहे. त्याच्या आता 86 सामन्यात 2196 धावा झाल्या आहेत.

हा पराक्रम करताना त्याने शोएब मलिक, ब्रेंडन मॅक्यूलम, विराट कोहली यांना मागे टाकले आहे.

या सामन्यात भारताने रोहितच्या शतकाच्या जोरावर 20 षटकात 2 बाद 195 धावा केल्या आहेत आणि विंडीज समोर विजयासाठी 196 धावांचे आव्हान ठेवले आहे.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक शतके करणारे खेळाडू:

4 – रोहित शर्मा

3 – कॉलीन मुनरो

2 – अॅरॉन फिंच/ ख्रिस गेल/ मार्टीन गप्टील/ एविन लुईस/ब्रेंडन मॅक्यूलम/ ग्लेन मॅक्सवेल/ केएल राहुल

महत्त्वाच्या बातम्या:

रोहित शर्माचा टी२०मध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा कारनामा़

दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघात सर्वात मोठा बदल

गौतम गंभीरचा आजपर्यंतचा सर्वात गंभीर निर्णय, सोडले या संघाचे कर्णधारपद

आजपासून हे स्टेडियम भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम नावाने ओळखले जाणार

सचिनप्रमाणेच विराटलाही भारतरत्न द्या, पहा कुणी केली मागणी