धोनी, विराट नव्हे तर कर्णधार रोहित शर्माने केला आहे हा मोठा पराक्रम

लखनऊ। भारत विरुद्ध विंडीज संघात आज(6 नोव्हेंबर) दुसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने 71 धावांनी विजय मिळवत 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

या विजयाबरोबरच भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मा विंडीज विरुद्ध दोन टी20 सामने जिंकणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.

याआधी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि सुरेश रैना यांनी कर्णधार म्हणून विंडीज विरुद्ध प्रत्येकी एका टी20 सामन्यात विजय मिळवला आहे.

भारत आणि विंडीज संघात आत्तापर्यंत 10 टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातील 5 सामन्यात विंडीजने बाजी मारली आहे. तर भारताला चार सामने जिंकण्यात यश आले आहे. तसेच एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली विंडीज विरुद्ध 2014 मध्ये टी20 सामना जिंकला आहे. हा सामना टी20 विश्वचषकात झाला होता.

तसेच त्याआधी भारताने 2011 मध्ये सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली विंडीज विरुद्ध पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात विजय मिळवला होता.

विंडीज विरुद्ध सध्या सुरु असलेल्या टी20 मालिकेत भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थिती प्रभारी कर्णधार रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच…

शतकवीर रोहित शर्माने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा बनला जगातील पहिलाच खेळाडू

धमाकेदार शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माचे ५ धमाकेदार विक्रम

रोहित शर्माचा टी२०मध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा कारनामा़

दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघात सर्वात मोठा बदल