मोठ्या अपयशानंतर रोहितचा धमाका! अखेर सचिनचा तो विक्रम मोडलाच

पोर्ट एलिझाबेथ। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पाचव्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने नाबाद अर्धशतकी खेळी केली आहे. ही खेळी करताना त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक खास विक्रम मोडला आहे.

रोहित अजूनही सामन्यात नाबाद खेळत आहे. त्याने आत्तापर्यंत या सामन्यात ४ षटकार मारले आहेत. त्यामुळे तो आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यानं हा विक्रम करताना सचिन तेंडुलकरच्या २६४ षटकारांचा विक्रमला मागे टाकले आहे.

या यादीत कॅप्टन कूल एमएस धोनी ३३८ षटकारांसह प्रथम स्थानी आहे. रोहितने आज त्याच्या वनडे कारकिर्दीतील ३५ वे अर्धशतक केले आहे. तसेच त्याची त्याच्या वनडे कारकिर्दीतील १७ व्या शतकाकडे दमदार वाटचाल सुरु आहे.

आज सामन्यात रोहितला कर्णधार विराट कोहलीची चांगली साथ मिळाली होती. मात्र विराट ३६ धावांवर बाद झाला. सध्या रोहित बरोबर अजिंक्य राहणे फलंदाजी करत आहे.

भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू:

एम एस धोनी: ३३८*
रोहित शर्मा: २६५*
सचिन तेंडुलकर: २६४
युवराज सिंग: २५१
सौरव गांगुली: २४७