हिटमॅन रोहित शर्माने आशिया खंडात जे कुणाला जमले नाही ते करुन दाखवले

इंदोर । रोहित शर्मा आणि कृणाल पांड्याने अखेरच्या १८ चेंडूंमध्ये ५१ धावा करत काल पंजाबविरुद्ध अशक्यप्राय विजयश्री खेचत आणली. पंजाबने दिलेल्या १७५ धावांचे आव्हान १९व्या षटकांत ४ बाद १७६ धावा करत मुंबईने पार केले. याचमुळे संघाने गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर मजल मारली.

या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने अफलातून फटकेबाजी करत १५ चेंडूत २४ धावा केल्या. त्यात त्याने २ षटकार आणि १ चौकार खेचला. त्याने मारलेला पहिला षटकार हा त्याचा टी२०मधील ३०० वा षटकार ठरला.

टी२०मध्ये ३०० षटकार खेचणारा तो ७वा खेळाडू ठरला.

टी२०मध्ये ३०० षटकार मारणार तो अशिया खंडातील पहिलाच खेळाडू ठरला. त्याने २७९ सामन्यात ७२५० धावा करताना ३०१ षटकार खेचले आहेत. तसेच तो टी२० सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता १०व्या स्थानावर आला आहे.

काल आयपीएलमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना तो १७व्यांदा नाबाद राहिला. धावांचा यशस्वी पाठलाग सर्वाधिक वेळा नाबाद रहाणारा तो रविंद्र जडेजा आणि युसुफ पठाण नंतरचा तिसरा खेळाडू आहे.

टी२०मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
८४४- ख्रिस गेल, सामने- ३२०
५२५- केराॅन पोलार्ड, सामने- ३७७
४४५- ब्रेंडन मॅक्क्युलम, सामने- ३२९
३६७- ड्वेन स्मिथ, सामने- ३१०
३५७- शेन वाॅटसन, सामने- २५९
३१९- डेविड वार्नर, सामने- २८२
३०१- रोहीत शर्मा, सामने- २६६
२९२- एबी डी विलियर्स, सामने- २४८
२९०- सुरेश रैना, सामने- २७०
२६६- राॅस टेलर, सामने- २२९

महत्त्वाच्या बातम्या –