रोहित शर्माचा टी२०मध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा कारनामा

लखनऊ। भारत विरुद्ध विंडीज संघात आज(6 नोव्हेंबर) पहिला टी20 सामना होत आहे. या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने एक खास विक्रम केला आहे.

या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना प्रभारी कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवनने भारताच्या डावाची सुरुवात केली आहे.

यावेळी जेव्हा रोहित 11 धावांवर पोहचला तेव्हा तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. तसेच त्याने भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकले आहे.

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत रोहित आता अव्वल क्रमांकावर आला आहे. त्याने 86 व्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात खेळताना 2103 धावा केल्या आहेत. याबरोबरच त्याने विराटच्या 2102 धावांना मागे टाकले आहे.

याबरोबरच आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या जगातील एकूण फलंदाजांमध्येही रोहित विराटच्या पुढे आला आहे. त्यामुळे आता या यादीत विराट आणि रोहित अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

यामध्ये न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टीन गप्टील अव्वल क्रमांकावर आहे. गप्टीलने 75 सामन्यात 2271 धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर रोहित आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक शतके करणाराही फलंदाज आहे. त्याने 3 शतके केली आहेत. तसेच रोहितसह या यादीत न्यूझीलंडचा कॉलीन मुनरोही अव्वल क्रमांकावर आहे. त्यानेही आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 3 शतके केली आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज-

2271 धावा – मार्टीन गप्टील (75 सामने)

2190 धावा – शोएब मलिक (108 सामने)

2140 धावा – ब्रेंडन मॅक्यूलम (71 सामने)

2103* धावा – रोहित शर्मा (86 सामने)

2102 धावा – विराट कोहली (62 सामने)

महत्त्वाच्या बातम्या:

दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघात सर्वात मोठा बदल

गौतम गंभीरचा आजपर्यंतचा सर्वात गंभीर निर्णय, सोडले या संघाचे कर्णधारपद

आजपासून हे स्टेडियम भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम नावाने ओळखले जाणार

सचिनप्रमाणेच विराटलाही भारतरत्न द्या, पहा कुणी केली मागणी

आज होत असलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात या ५ विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा

या कारणामुळे आजचा दिवस रोहित शर्माच्या कारकिर्दीत सुवर्णाक्षरांनी लिहीला जाणार