जर्सी नंबर १० वरून रोहित शर्माने केली शार्दूल ठाकूरची जोरदार चेष्टा

जर्सी नंबर १० वरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या शार्दूल ठाकूर पाठीमागची विघ्ने काही केल्या थांबत नाही. कधी क्रिकेट फॅन्स तर कधी संघासहकारीच शार्दुलची चेष्टा करताना दिसत आहेत.

काल सलामीवीर रोहित शर्माने त्याचे इंस्टाग्राम स्टेटस हे शार्दूल ठाकूरवर ठेवले होते. हॉटेलमध्ये बसलेले असताना शार्दूलचा फोटो शेअर करून रोहितने त्यावर ” हे भावा, तुझा जर्सी नंबर काय आहे? ” असे लिहिले आहे. आज तो फोटो मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रोहित आणि शार्दूल हे मुंबईकर रणजीपटू असून संघासहकारी आहेत. ते एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत. सध्या भारतीय संघात जे तीन मुंबईकर खेळाडू खेळत आहेत ते मुंबईच्या बलाढ्य रणजी विजेत्या संघातील संघसहकारी आहेत.

यदाकदाचित आपणास हे माहित नसेल तर ?

शार्दूल ठाकूरने श्रीलंकेविरुद्ध चौथ्या वनडे सामन्यात आंतराराष्ट्रीय पदार्पण केले आहे. अतिशय प्रतिभा असलेला खेळाडू १०व्या क्रमांकाची जर्सी घालून पहिल्याच सामन्यात खेळला. अपेक्षाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर त्याला सचिन चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. परंतु सचिनचाच जवळचा मित्र आणि महान फिरकीपटू हरभजन सिंग हा शार्दुलच्या मदतीला येऊन त्याला मोठा पाठिंबा दिला. शिवाय जर्सी नंबर १० घालण्यात काही गैर नसल्याचंही भज्जीने म्हटलं होत.